सर्व व्यक्तिंच्या जीवनात वास्तूशास्त्राचे एक खास महत्त्व असते. जर त्याचे योग्य पद्धतीने पालन केले गेले तर जीवनात सुख-समृद्धी व आनंद यांचे आगमन होते. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार, सकाळी करण्याजोगी काही अशी कामे आहेत जी व्यक्तीच्या आयुष्यावर खोल परिणाम करतात. जर एखाद्या व्यक्तीने या कामांचा त्याच्या दैनंदिन आयुष्यामध्ये समावेश केला तर त्याला नक्कीच सुखसमाधान प्राप्त होऊ शकते.
जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या वास्तू टिप्स आहेत ज्या फॉलो केल्याने सुख- शांती आणि आनंद घरात येऊ शकेल.
सकाळी उठल्यावर मुख्य दार स्वच्छ करा आणि सजवा :
वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या घराचे मुख्य दार स्वच्छ करून घ्या आणि ते सजवण्याचा प्रयत्न करा. यामुळे लक्ष्मी देवीची कृपा नेहमीच आपल्यावर राहते. आणि घरात सुखसमृद्धीही नांदते. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.
घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढा :
वास्तूशास्त्रानुसार, अशी मान्यता आहे की घरातील मुख्य ऊर्जेचा स्रोत म्हणून दरवाजाकडे पाहिले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा यावी याकरता घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढा. यामुळे लक्ष्मीचे घरात आगमन होते. आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल तर घराच्या प्रवेशद्वारावर कुंकू किंवा सिंदूराने शुभ लाभ लिहू शकता. यामुळे घरात कोणत्याही प्रकारच्या आजाराचा शिरकाव होऊ शकणार नाही. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
सकाळी पहिली पोळी गायीला खायला द्या :
वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात जेवण बनवण्यापूर्वी सर्वात पहिली बनलेली पोळी गायीला खायला द्या. कारण गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. गायीला पोळी खाऊ घातल्याने सर्व देवीदेवता प्रसन्न होतात. आणि व्यक्तीला सर्व कामांमध्ये यशदेखील मिळते.
सकाळी नियमितपणे करा तुळशीची पूजा :
असं म्हटलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळस आणि चमेली यांची रोपे लावावीत. ही रोपे लावल्यामुळे घरात धनधान्याचे आगमन होते. सकाळी लवकर उठून या रोपांचे दर्शन घ्यायला हवे.
सकाळी उठल्यानंतर वास्तू शास्त्राशी संबंधित या नियमांना अवश्य फॉलो करुन पहा.
हेही वाचा : Vastu Tips : तुळशीला जल अर्पण करताना करू नका या चुका
Edited By – Tanvi Gundaye