वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक भागाशी संबंधित काही नियम सांगितले आहेत, ज्याची काळजी घेतल्यास व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू लागतात. परंतु या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रात घराच्या उंबरठ्याशी संबंधित काही नियमही सांगण्यात आले आहेत, जे लक्षात ठेवले पाहिजेत.
असा असावा उंबरठा :
आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उबंरठा असायलाच हवी. तसं पाहायला गेलं तर लाकडी दाराचा उंबरठा शुभ मानला जातो, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. खरंतर, दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असं म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता यांना प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत. तसेच, दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता.
या चुका करू नका :
घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही जेवू नये आणि उंबरठ्यावर बसून केस विंचरू नयेत. तसेच, उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नये. असे मानले जाते की ही कामे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
ही गोष्ट कधीही करू नका :
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी उंबरठ्यावर कधीही बसू नये. असे मानले जाते की जर तुम्ही संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर बसलात तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत नाही, त्यामुळे घरात पैशाची समस्या कायम राहते.
तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात :
असे मानले जाते की उंबरठ्यावर उभे असताना एखाद्याने अतिथीचे स्वागत किंवा निरोप घेऊ नये. असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत उंबरठ्याच्या आत राहून, उंबरठ्याच्या बाहेर उभे राहून स्वागत आणि निरोप घ्यावा.
या गोष्टी लक्षात ठेवा :
तुमच्या घराचा उंबरठा तुटलेला किंवा तडा गेलेला नसावा याची विशेष काळजी घ्या. उंबरठ्यावरही स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन साधकाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते, असं म्हणतात.
हेही वाचा : Kitchen Tips : वर्षभर खोबरं फ्रेश राहण्यासाठी टिप्स
Edited By – Tanvi Gundaye