हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीमध्ये लक्ष्मी देवीचा आणि भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे सकाळ – संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते. घरात तुळशीचे रोप ठेवल्यास नकारात्नक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो. शुभ कार्यात तर तुळशीची पाने देवतांना अर्पण केली जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असते. मात्र, शास्त्रानुसार, तुळशीजवळ काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकटांना आमंत्रण मिळते. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीच्या रोपाजवळ काय ठेवू नये.
- तुळशीचे रोप अंगणात असेल तर त्याजवळ चुकूनही चप्पल किंवा बूट ठेवू नयेत. यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
- तुळशीजवळ झाडू कधीही ठेवू नये. शास्त्रात असे करणे चुकीचे सांगण्यात आले आहे.
- काहींना देवदेवीतांच्या मूर्ती, फोटो तुळशीच्या कुंडीत ठेवायची सवय असते. पण, असे करू नये. शिंवलिंग तर चुकूनही ठेवू नये.
- तुळशीचे रोप काटेरी रोपांसोबत ठेवू नये. असे केल्याने अशुभ मिळण्यास सुरुवात होते. घरात वादविवाद, भांडण, तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.
- तुळशीजवळ तुटलेली भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकटे सुरू होतात.
- तुळशीजवळ जुनी, गंज लागलेली भांडी ठेवू नये. यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे प्रगतीत अडथळे येतात आणि पैशांची चणचण जाणवते.
- तुळशीच्या रोपाजवळ ताजी फूले ठेवावीत. सुकलेली फूले ठेवू नये. सुकलेल्या फूलांमुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.
- तुळशीच्या रोपाजवळ कचरा कुंडी किंवा डस्टबिन ठेवू नये. असे केल्याने तुळशी मातेचा आर्शिवाद राहत नाही आणि आर्थिक अडचणी सुरू होतात.
हेही पाहा –