Monday, March 17, 2025
HomeमानिनीReligiousMoney Plant : घराच्या कोणत्या दिशेला मनी प्लांट लावावे?

Money Plant : घराच्या कोणत्या दिशेला मनी प्लांट लावावे?

Subscribe

मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो, जो शारीरिक सुख, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे. घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. तसेच, पाने जितकी हिरवी असतील तितके झाडाला फायदे मिळतात.  पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहेत. या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो ते जाणून घेऊया.

  • जर तुम्ही मनी प्लांट लावण्याचा विचार करत असाल, तर ते घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावा. वास्तूनुसार या दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे सुख-समृद्धीही वाढते.
  • मनी प्लांट ईशान्य दिशेला लावणे टाळावे. या दिशेने रोपे लावल्याने कुटुंबातील सदस्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.
  • घराच्या बाहेर मनी प्लांट लावणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराबाहेर लावल्याने बाहेरील लोकांची नजर झाडावर पडते, त्यामुळे झाडाची वाढ थांबते आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
  • कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा, यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात.

मनी प्लांटच्या वेलीची अशी काळजी घ्या

मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी. त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंढाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशापद्धतीने दोरी बांधून द्या. वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते.


 

Manini