Prepare time: 30min
Cook: 15-20 min
Ready in: 45 min
Ingredients
- मैदा - एक कप
- कोबी
- कांदा
- गाजर
- लसणाच्या पाकळ्या
- सोया सॉस
- बेकिंग पावडर
- दुध
- तेल
- मीठ
Directions
- सर्वात आधी एका भांड्यात मैदा आणि बेकिंग पावडर टाकावी.
- यानंतर दुधाने पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ तासभर झाकून ठेवावे.
- आता स्टफिंग तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या आणि कांदा परतून घ्यावा.
- कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिरलेला कोबी, गाजर घालून मिक्स करून परतून घ्यावा.
- भाज्या शिजत आल्यावर त्यात सोया सॉस आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यावे, तुमचे स्प्रिंग रोलचे स्टफिंग तयार झाले आहे.
- स्प्रिंग रोल तयार करण्यासाठी पीठाचे गोळे तयार करून घ्यावेत आणि त्याची पोळी लाटून घ्यावी. तयार पोळी दोन्ही बाजूने तव्यावर भाजून घ्यावी.
- तयार पोळी चौकोनी आकारात कापून घ्या आणि त्यात तयार स्टफिंग भरा.
- यानंतर तुम्हाला रोल चारही बाजूने पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तळताना स्टफिंग बाहेर येणार नाही.
- कढईत तेल गरम झाल्यावर स्प्रिंग रोल गोल्डन रंगाचे होईपर्यत भाजून घ्यावेत.
- तुमचे स्प्रिंग रोल तयार झाले असून गरमा-गरम सर्व्ह करावेत.