Prepare time: 20 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- बासमती तांदूळ - 3 कप
- कांदा - २ चिरलेले
- भाज्या आवडीनुसार - फरसबी, गाजर,फ्लॉवर, मटार,
- काजूचे तुकडे
- हिरव्या मिरच्या - 1 ते 2
- जीरे
- तेल
- काळीमिरी, लवंग, दालचिनी, चक्रफुल, वेलची, तमालपत्र,
Directions
- तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवा. सर्व भाज्या उभ्या कापून घ्याव्यात.
- मोठ्या भांड्यात तेल गरम करण्यास ठेवा. तेल गरम झाले की, सर्व खडे मसाले आणि जीरे तेलात परतून घ्याव्यात.
- यानंतर यात चिरलेला कांदा, काजूचे तुकडे परतून घ्या.
- कांदा गुलाबीसर रंगाचा झाल्यास त्यात सर्व कापलेल्या भाज्या, लाल तिखट, हळद मिक्स कराव्यात.
- भाज्या पुर्णपणे परतून घ्याव्यात आणि यानंतर हिरव्या मिरच्या टाकाव्यात पुन्हा सर्व साहित्य एकजीव करून 4 ते 5 मिनीटांसाठी शिजवून घ्यावे.
- चवीपुरते मीठ टाकून घ्या.
- या भाज्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घाला आणि एक उकळी आल्यावर भिजवलेले तांदूळ त्यात मिक्स करा.
- नंतर 15 ते 20 मिनीटे झाकण ठेवून वाफेवर पुलाव शिजवून घ्या.
- तुमचा झटपट व्हेज पुलाव तयार झाला आहे, कोशिंबीर आणि पापडासोबत सर्व्ह करा.