Sunday, January 19, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : वेलवेटच्या साड्या आणि लेहंग्यांचा ट्रेंड

Fashion Tips : वेलवेटच्या साड्या आणि लेहंग्यांचा ट्रेंड

Subscribe

काळानुसार फॅशनमध्ये अनेक बदल घडत असतात. लोकांच्या आवडीनिवडी, संस्कृती, आणि जीवनशैली यांचा फॅशनवर मोठा प्रभाव पडतो.बऱ्याचदा जुन्या फॅशन ट्रेंड्स नव्या पद्धतीने परत येतात. सोशल मीडियामुळे लोकांवर जास्त प्रभाव पडतो. आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला फॅशनचे ट्रेंड माहिती बदल या सर्व गोष्टी जाणून घेता येतात. हल्ली साड्यांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक बदल पाहायला मिळतात. सध्या वेलवेटच्या साड्या आणि लेहंगे खूप ट्रेंडमध्ये आहे. आज आपण वेलवेटच्या साड्या आणि लेहंग्यांचा ट्रेंड याबद्दल जाणून घेऊयात.

वेलवेट सलवार सूट

मखमली वेलवेट सलवार सूट हे खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाने स्टाइल देखील करू शकता. या सलवार सूटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल देखील करू शकता. हे सूट तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळतील.

वेलवेट लेहंगा

2000 सालामध्ये वेलवेट ड्रेसची क्रेज खूप होती. आता ही फॅशन पुन्हा आली आहे. बाजारातील को-ऑर्डर स्टाईल आउटफिट्स, फिश कट ड्रेसेस आणि धोती ड्रेसेसमध्ये अनेक वेलवेट लेहंगे दिसतील. यामध्ये तुम्हाला अनेक रंग आणि पैर्टन्स देखील मिळतील. आता बरेच लोक पार्टीला किंवा कोणत्याही फंक्शनल वेलवेट लेहंगा घालतात.

ब्राइडल वेलवेट लेहंगा

हल्ली ब्राइडल लेहंग्यामध्ये बऱ्याच मुली या वेलवेट रंगाचा लेहंगा घालतात. हा लेहंगा खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. या वेलवेट लेहंग्यामध्ये तुम्हाला असंख्य रंग आणि डिझाइन्स मिळतील. हा लेहंगा तुम्हाला बाजारात आणि मार्केट दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळतील.

वेलवेट साडी

तुम्ही लेहंग्यासह वेलवेट साडीची देखील निवड करू शकता. हल्ली बऱ्याच मुलींना वेलवेट साडी नेसायला खूप आवडते. या साडीत तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल. या साडीमध्ये तुम्हाला प्रकार आणि रंग दोन्ही सहजपणे मिळेल.

या वेलवेटच्या साड्या आणि लेहंगे तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे स्टाइल करू शकता.

हेही वाचा : Beauty Tips : या 4 लिपस्टीक शेड्स तुमच्याकडे असायलाच हव्यात


Edited By : Prachi Manjrekar

Manini