प्रत्येक वधूसाठी तिच्या लग्नातला लेहंगा हा खूप खास असतो. हा लेहंगा एक सामान्य लेहंगा नसून एक सुंदर क्षणाची आठवण असते. हा लेहंगा लग्न झाल्यावर असाच वॉर्डरोबचे पडून राहतो. हा लेहंगा खूप हैवी असल्यामुळे आपण कोणत्याही खास कार्यक्रमात हा घातला जात नाही. परंतु तुम्ही हा लेहंगा रियूज करू शकता. आज आपण जाणून घेऊयात लग्नातला लेहंगा कसा रियूज करायचा.
फॅशनचे ट्रेंड सतत बदलत असतात त्यामुळे लेहंगा कितीही सुंदर असाल तरी काही काळानंतर त्या लेहंग्याची फॅशन निघून जाते. त्यामुळे आपण लेहंगा रियूज देखील करत नाही. परंतु तुम्ही काही टिप्सने हा लेहंगा पुन्हा रियुज करू शकता.
लेहंग्यासह कॉन्ट्रास्ट करा
तुम्ही लेहंग्याचा दुपट्टा आणि ब्लाउज इतर कोणत्याही कपड्यांसोबत सहजपणे मिक्स आणि मॅच करू शकता.ब्लाउजला कोणत्याही साडीसोबत कॉन्ट्रास्ट करू शकता.याशिवाय, तुम्ही कोणत्याही पार्टीत सूट घालून जड दुपट्टा कॅरी करू शकता. इतकंच नाही तर लेहेंग्यासोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॅरी करू शकता.
लेहंगा स्टाइल प्रमाणे कैरी करा
तुम्ही स्टाइल प्रमाणे लेहंगा कैरी करू शकता. एका बाजूने ओढणी घेऊन त्याला पिंनप करू शकता. यामुळे तुमच्या लेहंग्याला एक वेगळा लूक मिळेल. आजकाल लेहेंग्यापासून साडी बनवण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही हा हटके लूक ट्राय करू शकता.
ब्लाउजसह प्लेन लेहंगा
तुम्ही ब्लाउजसह हे प्लेन लेहंगे देखील स्टाइल करू शकता . या लेहंग्यासह तुम्ही कोणताही स्टयलिश ब्लाउज घालू शकता. आजकाल बाजारात अनेक ट्रेंडी ड्रेप स्कर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या लग्नाचा ब्लाउज या स्कर्टसह स्टाइल करू शकता.
साडी
तुम्ही तुमच्या लग्नाच्या लेहंग्याला साडीचा लूक देखील देऊ शकता. ही साडी खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही लग्नातला लेहंगा पुन्हा रियूज करू शकता.
हेही वाचा : Ready to wear saree fashion : तरुणींना भुरळ घालतोय रेडी टू विअर साड्यांचा ट्रेंड
Edited By : Prachi Manjrekar