Sunday, December 8, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीReligiousWedding Rukhwat : लग्नात रुखवत का दिलं जातं? जाणून घ्या

Wedding Rukhwat : लग्नात रुखवत का दिलं जातं? जाणून घ्या

Subscribe

लग्नसराई जवळ आली की रुखवताच्या तयारीला ही सुरुवात होते.  नवरीला सासरी पाठवताना रुखवत देण्याचीही प्रथा आहे. लग्नाच्या मंडपात एका बाजूला हे रुखवत मांडलेलं असतं. पारंपरिक रुखवतावर नावं घातलेली स्टीलची पाच ताटे, वाट्या, कुकर इ. गृहोपयोगी वस्तू व संसारोपयोगी कलाकुसरीच्या वस्तू या घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते. लग्नानंतर हे रुखवत नवरी मुलगी सासरी घेऊन जाते.

रुखवत का दिलं जातं?

पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुलगी लग्न होऊन सासरी गेली की माहेरच्या लोकांशी मुलीचा संपर्क क्वचितच व्हायचा. आपली आठवण मुलीला राहावी या उद्देशानं मुलीच्या मावश्या,आत्या,काकी, बहीणी आणि मैत्रिणी एकत्र बसून काही विशेष वस्तू आपल्या हाताने बनवून देत असे .

- Advertisement -

रुखवतात दिल्या जाणाऱ्या वस्तू

बैलगाडी,डोली,सप्तपदी,सौभाग्य अलंकार, आईचा निरोप लिहिलेली कार्डशीटस्, तुळशी वृंदावन, सजवाट केलेले कलश,सजवलेली पान-सुपारी, कृष्णाची हंडी, विणलेला ताटावरील रुमाल, विणलेले तोरण, विणलेला झूला, विणलेला आरसा, विणलेल्या बाहुल्या, विणलेला गणपती, सजविलेले घर, आईस्क्रीम काड्यांची होडी, रंगीत शेवया, झुंबर, लटकन, डिझायनर तोरण,सनई-चौघडा,नवरा-नवरी,सुपारीचे भटजी, विहिण पंगत,गौरीहार,जातं,पाटा-वरवंटा,उखळ,भातुकली,फुलदाणी, फळे या गोष्टी साधारण कोणत्याही रुखवतामध्ये असतात.

- Advertisment -

Manini