Thursday, March 20, 2025
HomeमानिनीRecipeGarlic Naan : रेस्टॉरंट स्टाइल गार्लिक बटर नान

Garlic Naan : रेस्टॉरंट स्टाइल गार्लिक बटर नान

Subscribe
Prepare time: 1 hr
Cook: 25 - 30 min
Ready in: 1 hr 30 mins

Ingredients

  • पीठ - दिड कप ( 1 कप मैदा आणि अर्धा कप )
  • ड्राय यीस्ट - अर्धा चमचा
  • दही - 1 चमचा
  • दूध - 2 चमचे
  • साखर - अर्धा चमचा
  • कोमट पाणी
  • चिरलेला लसूण - 2 चमचे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - 3 चमचे
  • बटर
  • तेल

Directions

  1. सर्वात आधी एक बाऊलमध्ये ड्राय यीस्ट घ्यावे आणि त्यात साखर, कोमट पाणी टाका आणि एकजीव करून घ्या.
  2. तयार मिश्रण15 मिनिटे झाकून ठेवा.
  3. या मिश्रणात फोम दिसला तर समजावे यीस्ट व्यवस्थित झाले आहे.
  4. यानंतर एका मोठ्या भांड्यात दीड कप मैदा चाळून घ्यावा.
  5. मैदा चाळल्यानंतर दही, तेल, मीठ आणि यीस्ट घालावे.
  6. आता तयार पीठ चपातीच्या पीठाप्रमाणे मळून घ्या आणि कणीक ओल्या कपड्याने तासभर झाकून ठेवा.
  7. तासाभरानंतर पीठ फुगलेले दिसेल.
  8. तयार पीठाचे गोळा बनवा. त्यावर पीठ लावा आणि लांबीच्या दिशेने अंडाकृती आकारात लाटून घ्या.
  9. त्यावर आता चिरलेला लसूण, कोथिंबीर घालावी.
  10. आता नान उलटी करून त्यावर हाताने पाणी लावून ती ओली करून घ्या.
  11. नान आता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.

Manini