नातेसंबंधात भावनिक जवळीक असणं महत्वाचं आहे. कारण याच भावनेवर नाती टिकतात. पण जर तुमच्या नात्यात ही भावनिक जवळीक नसेल तर मात्र तुमचे नाते फार काळ टिकणार नाही. यामुळे ही इमोशनल इंटीमेसी कशी ओळखायची ते समजायला हवं.
न सांगता कळणं
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला काहीही न सांगतादेखील त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला कळत असतील तर तुमचे नाते भावनिक असल्याचे हे लक्षण आहे.
मनमोकळा संवाद
जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर कसलाही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधता त्याच्याशी काही गोष्टी बिनधास्त शे्अर करत असाल तर तुमचे नातेसंबंध प्रगल्भ आहेत. त्यामुळे तुमची इमोशनल इंटीमेसीही मजबूत असल्याचे समजून जा.
लहान गोष्टींमध्ये आनंद
जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला लहान लहान गोष्टींमधून सारखाच आनंद मिळत असेल तर तुमचे नाते भावनिकरित्या भक्कम आहे हे ओळखा.
सपोर्ट सिस्टम
ज्यावेळी सगळे तुमच्या विरोधात जातात किंवा तुम्ही अडचणीत असता अशावेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमचे घट्ट भावनिक नाते असल्याचे ओळखा. हे हेल्दी नात्याचे प्रमुख लक्षण आहे.
एकत्र वेळ घालवण्यात आनंद
जर तुमच्यात भावनिक नाते चांगले असेल तर एकमेकांसोबतचा वेळही छान जातो. एकमेकांची कंपनी तुम्हाला आवडते. एकत्र वेळ घालवण्यासाठी तुम्ही निमित्त शोधता.