वास्तु शास्त्रात स्वयंपाक घराला पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे असे मानले जाते की, स्वयंपाक घरातील काही गोष्टींचा कधीही तुटवडा पडू देऊ नये. नाहीतर घराची आर्थिक परिस्थिती डगमगू शकते. त्यामुळे या गोष्टी जास्त प्रमाणात घरात आणाव्यात किंवा संपायच्या आत तुम्ही आणू शकता. घरात सुखशांती टिकवून ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात येते. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा कुटुंबाच्या समृद्धीसह संबंध जोडण्यात येतो. या पदार्थांची घरात कमतरता असेल तर आर्थिक समृद्धी आणि सुख समाधानाचीही कमतरता येते असा समज आहे. त्यामुळे जाणून घेऊयात स्वयंपाकघरातील कोणत्या गोष्टी कधीही संपवू नये
मीठ
मीठ जेवणाची चव वाढवते. मात्र स्वयंपाक घरातील मीठ कधीही संपवू नये, असे वास्तुशास्त्र सांगते. संपण्याआधीच नवीन मीठ घरात आणावे. घरातील मीठ संपल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते. तसेच मीठ नजर काढण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. शिवाय मिठामुळे घरातील राहू-केतूचे अशुभ प्रभावसुद्धा दूर होतात.
तांदूळ
हिंदू धर्मात तांदळाचा वापर पूजा करण्यासाठी केला जातो, त्याला अक्षता असं म्हणतात. वास्तु शास्त्रानुसार तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित धान्य आहे. असं म्हणतात की, घरातील तांदूळ संपल्यास शुक्र ग्रहाचे दोष लागतात. ज्यामुळे तुम्हाला धानाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
हळद
तुमच्या स्वयंपाक घरातील हळद कधीही संपणार नाही, याची काळजी घ्यावी. आयुष्याला सुखी करण्यासाठी वास्तू शास्त्रात हळदीशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच हळद गुरू ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे घरातील हळद संपल्यास गुरू ग्रहाचा अशुभ प्रभाव तुमच्या घरावर होऊ शकतो.
पीठ
पिठाशिवाय घरात पोळी-भोकरी तयार होत नाही. वास्तू शास्त्रानुसार पिठाचा संबंध तुमच्या आर्थिक स्थितीशी निगडित आहे. त्यामुळे घरातील पीठ कधीही संपणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी.
तेल
स्वयंघरातील तेल संपण्याआधी नवीन आणून ठेवावे. तेलाचा संबंध शनी ग्रहाशी आहे. घरातील तेल संपल्यास शनी ग्रहाचे अशुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडू शकतात.
हेही पाहा –