दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची मनोभावे पूजा करण्यात येते. संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून केल्यास इच्छित फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे शास्त्रात म्हटले आहे. आज 17 जानेवारीला महिन्याची संकष्टी चतुर्थी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊयात, संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टींचे दान करावे.
संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त –
संकष्टी चतुर्थी 17 जानेवारीला पहाटे 4. 06 पासून सुरू होईल आणि शनिवारी 18 जानेवारीला पहाटे 5.30 वाजेपर्यत राहील. चंद्रोदयाची वेळ रात्री 9.09 वाजता आहे.
पुढील गोष्टींचे करावे दान –
- शास्त्रानुसार, काळ्या तिळामध्ये देवता वास करतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करू शकता.
- संकष्टी चतुर्थीला गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, या गुळाचे दान आयुष्यातील संकटे दूर करण्यास मदत करते.
- तुम्ही संकष्टी चतुर्थीला मीठाचे दान करू शकतात. मिठाचे दान केल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते, असे म्हणतात.
- तुम्ही संकष्टी चतुर्थीला उबदार कपडे दान करू शकता. यामुळे गरजूंना मदत होईल. कपड्यांच्या दानामुळे गरजुंचा आर्शिवाद मिळेल आणि तुमची प्रगती होईल.
पुढील गोष्टी चुकूनही दान करू नये –
- हळद
- तेल
- धारदार वस्तू
काय कराल –
- आज श्री गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.
- चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी.
- बाप्पाला मोदक आवडतात, तुम्ही नैवेद्यात मोदक अर्पण करू शकता.
- दुर्वा बाप्पाला प्रिय आहे, तुम्ही मनोभावे अर्पण करू शकता.
हेही पाहा –