सूर्य यंत्राचा संबंध सूर्याच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य नऊ ग्रहांचा राजा देखील आहे. कुंडलीत सूर्याच्या बलामुळे व्यक्तीच्या जीवनात वेगाने प्रगती होते. प्रत्येक कामात यश मिळण्यासोबतच जेव्हा सूर्याची स्थिती मजबूत होते. ज्यामुळे व्यक्तीला भरपूर पैसा तर मिळतोच पण समाजात त्याचा मान-सन्मानही वाढतो, असे म्हणतात. त्यामुळे वास्तूशास्त्रात घरी सूर्ययंत्र ठेवणे लाभदायी मानले जाते. सूर्ययंत्रामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पण, त्यासाठी सूर्ययंत्र घरात योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊयात, घरात सूर्ययंत्र ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती.
सूर्ययंत्रासाठी पूर्व दिशा योग्य –
- वास्तूशास्त्रानुसार, घराच्या पूर्व दिशेला सूर्ययंत्र ठेवणे शुभ मानले जाते.
- पूर्व दिशा ही सुर्योदयाची दिशा आहे आणि ही दिशा सकारात्मकतेचे प्रतिक मानले जाते.
- भिंतीवर सूर्ययंत्र स्थापित करताना यंत्राचे पुर्वेकडे तोंड असेल याची खात्री करावी.
- यंत्र कायम उंच ठिकाणी लावावे.
- सूर्ययंत्र स्थापित करताना मंत्राचा जप करावा.
- यंत्र स्थापित केल्यावर त्याची नियमित पूजा करावी.
फायदे –
- घरात सूर्ययंत्र ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो.
- निरोगी आरोग्यासाठी सूर्ययंत्र घरात ठेवावे.
- आत्मविश्वास वाढवण्यासाठी सूर्ययंत्र घरात ठेवणे फायद्याचे ठरते.
- कुंडलीत सूर्य ग्रह अशुभ स्थितीत असल्यास सूर्य यंत्राची उपासना केल्यास लाभ मिळू शकतो.
सूर्ययंत्राची पूजा करताना म्हणावेत पुढील यंत्र –
- ओम सूर्याय नम:
- ओम गुरुभ्यो नम:
- ओम आदित्याय नम:
हेही वाचा :