हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेक जणांना जाणवते. केस पांढरे होणे लाजीरवाणी गोष्ट आहे. खरं तर जसेजसे वय वाढत जाते तसतसे केस पांढरे होतात. पण, हल्ली लहान वयातच केस पांढरे होत आहे. सहसा केस पांढरे होण्याला चुकीची हेअर ट्रिटमेंट, हेअर प्रॉडक्ट कारणीभूत ठरतात. पण, काही वेळा तुमच्याकडून नकळत होणाऱ्या काही गोष्टी केस पांढरे होण्याला जबाबदार ठरतात. जाणून घेऊयात, अशा काही चुका ज्या लहान वयातच केस पांढरे होण्याला कारण ठरतात.
- अनेकदा केस काळे होण्याला अनुवंशिकता कारणीभूत ठरते. तुमच्या घरातील मंडळीमध्ये कोणाचे केस लवकर झाले असतील, तर त्यामुळे सुद्धा तुमचे केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात.
- धावपळीच्या युगात केस काळे होण्याला तणाव कारण ठरत आहे. तणावामुळे केवळ शारीरिक किंवा मानसिक नाही तर केसांवरही परिणाम होत आहे.
- शारीरिक आजार होण्याला चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजेच अयोग्य आहार कारणीभूत ठरत आहे. तुम्ही योग्य आहार न घेतल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अपूऱ्या आहारामुळे केसांना पोषक घटक मिळत नाही आणि तुमचे केस पांढरे होऊ लागतात.
- बाजारातील केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्टमुळे केसांवर परिणाम होत आहे. केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट म्हणजेच तेल, जेल आणि केमिकल वापरल्याने केसांचे आरोग्य बिघडत असून केस लवकर पांढरे होत आहेत.
- स्मोकींग – स्मोकींगमुळे केवळ शारीरिक समस्याच नाही तर केसांवर परिणाम होत आहे. अकाली केस पांढरे होणे, केस गळती, केसांमध्ये कोंडा होणे अशा तक्रारी सुरू होत आहेत.
अशी घ्यावी काळजी –
- केसांना तेलाने मसाज करावे. यासाठी तुम्हाला खोबरेल, बदामाचे तेल वापरता येईल. केसांना नियमित तेल लावून मसाज केल्याने केस मजबूत होतात..
- केसांच्या आरोग्यासाठी पोषणमुल्य देणारा आहार करावा. आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्यांचा समावेश करावा.
- केस धुताना केमिकल प्रॉडक्टऐवजी आवळा, शिककाईचा वापर करावा.
- स्ट्रेस, टेन्शनपासून दूर राहावे. यासाठी रोज मेडीटेशन, ध्यान तुम्ही करू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde