Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 2 वाटी पास्ता (पेन, फ्यूसिली किंवा तुमच्या आवडीचा)
- 4 कप पाणी
- 1चमचा मीठ
- व्हाइट सॉससाठी:
- 2 चमचे बटर
- 2 चमचे मैदा
- 2 कप दूध
- 1/2 चमचे मिरे पावडर
- १/2 चमचे मिक्स हर्ब्स (ऑरेगानो, चिली फ्लेक्स, थायम)
- 2 वाटी चीझ (मोझरेला किंवा प्रोसेस्ड)
- चवीनुसार मीठ
- 2 वाटी चिरलेला कांदा
- 2 वाटी शिमला मिरची चिरलेली ( तुमच्या आवडीची शिमला मिर्च )
- 2 वाटी स्वीट कॉर्न
- 1 चमचे लसूण पेस्ट
Directions
- एका भांड्यात पाणी उकळवा त्यामध्ये मीठ आणि तेल घाला.
- आता त्यामध्ये पास्ता घालून मध्यम आचेवर पास्ता मऊ होत नाही तो पर्यत चांगलं उकळून घ्या.
- पास्ता चांगला शिजला तो गाळून थंड पाण्याने धुवून बाजूला ठेवा.
- एका पॅनमध्ये १ चमचा तेल घालून त्यात लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्या.
- त्यामध्ये शिमला मिरची, स्वीट कॉर्न घालून २-३ मिनिटे परता.
- भाज्या थोड्या शिजल्यावर गॅस बंद करा आणि बाजूला ठेवा.
- एका कढईत बटर गरम करा आणि त्यामध्ये मैदा घालून हलक्या गॅसवर १-२ मिनिटे परता.
- हळूहळू दूध घालून सतत ढवळत राहा, गुठळ्या होऊ देऊ नका.
- मिश्रण जरा दाटसर झाल्यावर त्यात मीठ, मिरे पावडर, मिक्स हर्ब्स आणि चीझ घाला.
- सॉस मऊ आणि क्रीमी झाल्यावर गॅस बंद करा.
- व्हाइट सॉसमध्ये शिजवलेला पास्ता आणि भाजून घेतलेल्या भाज्या घालून चांगले मिक्स करा.
- २ मिनिटे हलक्या आचेवर परता, जेणेकरून सर्व घटक चांगले मिक्स होतील.