हिंदू धर्मात लोकं पूजेच्या वेळी घरात कापूर जाळतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर (camphor Benefits) वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते. देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते तेव्हा त्यात कापूर नक्कीच वापरला जातो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की आरती विधीत कापूर का जाळला जातो? त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? जाणून घ्या.
कापूर जाळण्यामागील धार्मिक कारण
- पूजेच्या वेळी, हवनात किंवा आरतीच्या वेळी कापूर वापरला नाही तर पूजा अपूर्ण राहते, असे मानले जाते
- शास्त्रानुसार देवी-देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही.
- कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात.
- कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते.
कापूर जाळण्यामागील वैज्ञानिक कारण
- कापूर जाळण्यामागे केवळ आध्यात्मिकच नाही, तर वैज्ञानिक कारणेही आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, कापूर जाळल्याने अनेक प्रकारचे जीवाणू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते.
- कापूर जाळल्याने अनेक हानिकारक जीवाणूंचा संपर्क टाळता येतो, त्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. जेव्हा कापूर जाळला जातो तेव्हा वातावरणात एक सुखद सुगंध पसरतो ज्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव येतो.
- रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत.
विविध धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे लक्षात घेऊन घरामध्ये कापूर जाळणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि यामुळे अनेक नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकतात. ज्योतिष आणि शास्त्र दोन्हीनुसार कापूर जाळणे घरासाठी शुभ मानले जाऊ शकते.
- Advertisement -