बरेच लोक आपल्या हाताला किंवा पायामध्ये काळा धागा बांधतात. काहीवेळा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. काळा धागा हातात किंवा पायाला बांधण्याची प्रथा अनेक ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक आणि प्राचीन विश्वासांशी संबंधित असते. बरेच लोक फॅशन म्हणून देखील पायात किंवा हातात काळा धागा बांधतात. पायात काळा धागा बांधण्याचा ट्रेंड आजकाल खूप वाढत चाला आहे. मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे काळे धागे पाहायला मिळतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? पायात काळा धागा का बांधला जातो.
वाईट नजर
काळा धागा पायात बांधल्याने वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा किंवा अपशकून टाळण्यासाठी, बरेच लोक पायात काळा धागा बांधतात. काही ठिकाणी ते शुभतेचं प्रतीक देखील मानले जाते. विशेषतः लहान मुलं किंवा स्त्रिया पायामध्ये काळा धागा बांधतात.
नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणे
काळ्या रंगामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीर आणि मन शांत राहते.जर आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर, त्यापासून संरक्षण करण्यासाठी काळा धागा बांधला जातो.
धार्मिक विश्वास
अनेक धार्मिक परंपरांमध्ये काळा धागा बांधण्याला शुभ मानले जाते.
सांस्कृतिक परंपरा
बऱ्याचदा ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आल्यामुळे ते देखील ही प्रथा फॉलो करतात.
काळा धागा बांधण्याचे फायदे
- काळा धागा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करते.
- काळा धागा बांधल्याने आध्यात्मिक संरक्षण मिळते.
- काळा धागा बांधल्याने आर्थिक समृद्धी मिळते असे देखील मानले जाते.
हेही वाचा : Tulsi Plant : घरात तुळशीचे रोप का लावावे?
Edited By : Prachi Manjrekar