आपल्या प्रत्येकाला खास प्रसंगी तयार व्हायला खूप आवडते. आपला लूक ऑउटफिट ज्वेलरीसह लिपस्टीकमुळे देखील परिपूर्ण होते. लिपस्टिकमुळे आपला लूक खूप ग्लॅमर्स आणि सुंदर दिसतो. हल्ली मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन तुम्हाला लिपस्टीकचे असंख्य शेड्स प्रकार मिळतील. या असंख्य पर्यायांमुळे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही , कोणती लिपस्टिक आपल्यासाठी योग्य असेल आणि आपल्या लूकसाठी बेस्ट असेल.
तुम्ही तुमच्या ऑऊटफिट किंवा तुमच्या आवडीच्या शेड्स प्रमाणे लिपस्टीकची निवड करू शकता. बऱ्याचदा शेड खूप सुंदर असतो. पण तो तुमच्या ऑऊटफिटवर जात नाही. आज आपण जाणून घेऊयात, कोणत्या ४ लिपस्टिक आपल्याकडे असायलाच हव्यात .
न्यूड शेड
सध्या न्यूड शेड खूप ट्रेंडिंग आहे. हल्ली बऱ्याच लोकांना न्यूड शेडस वापरायला खूप आवडतात. या न्यूड शेडसमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि रंग देखील मिळतील. कॉलेज किंवा ऑफिससाठी ही लिपस्टिक उत्तम आहे.
प्लम किंवा बेरी शेड्स
जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडत असेल तर तुम्ही प्लम किंवा बेरी शेड्स लिपस्टीक ट्राय करू शकता. ही शेड खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. ही लिपस्टीक कोणत्याही ऑउटफिटवर चांगली दिसेल.
ब्राइट रेड शेड
जर तुम्हाला कुठे लग्नाला किंवा कोणत्या खास कार्यक्रमाला जायचं असेल तर तुम्ही ही ब्राइट रेड शेड असलेली लिपस्टिक लावू शकता. ही लिपस्टिक तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. ही लिपस्टिक तुमच्या ऑऊटफिटवर खूप सुंदर दिसेल. ब्राइट रेड शेडस मध्ये सुद्धा तुम्हाला खूप सुंदर शेड्स मिळतील.
मरून
हल्ली मरून शेडची लिपस्टिक खूप ट्रेंडिंग आहे. ही लिपस्टिक तुम्ही कोणत्याही ऑऊटफिटवर ट्राय करू शकता. ही लिपस्टिक खूप सुंदर दिसेल तुमचा लूक देखील आकर्षक वाटेल.
या सुंदर 4 लिपस्टिक तुम्ही ट्राय करू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : सोनम कपूरचे हे ब्यूटी हॅक्स करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar