Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'लॉ ऑफ लव्ह' सिनेमाचा दमदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाचा दमदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या आसमंत गुलााबी वातावरणात व्हेलेंटाईन डे च्या खास प्रसंगी "लॉ ऑफ लव्ह'' या सिनेमाचा दमदार टिझर रिलिज

Related Story

- Advertisement -

‘व्हेलेंनटाईन डे’ च्या या खास प्रसंगी वेदिका फिल्म क्रिएशन प्रस्तुत “लॉ ऑफ लव्ह” या सिनेमाचा धडाकेबाज टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थंडीच्या गोड गुलाबी वातावरणात प्रेमाची अलगद लागणारी उब एक वेगळाच अनुभव देऊन जाते. त्यातही जगमान्य प्रेमाचा उत्सव साजरा होत असल्यामुळे व्हॅलेंटाईन डे सगळ्यांसाठी स्पेशल असतो. अशीच प्रेमाची नवीन परिभाषा शिकवणारी कहाणी ”लॉ ऑफ लव्ह” सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.नुकताच या सिनेमाचा टिझर सोशल मीडिया साईट्सवर लॉंच केला गेला आहे.

- Advertisement -

अभिनेता व निर्माता उदय जानकर आणि अभिनेत्री शाल्वी शहा यांच्या रूपाने लविंग डॅशिंग आदित्य आणि साक्षी यांचं अनोखं प्रेम पाहायला मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नागरकर, सचीन मस्के आणि प्राची पालवे यांसारखे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साऊथचा तडका असलेला हा सिनेमा जो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक मनापासून एन्जॉय करू शकतील यात शंका नाही.

 

- Advertisement -