शिवडी किल्ल्याला गतवैभव मिळणार, किल्ल्यात विद्युत रोषणाईची व्यवस्था

माहिम व वरळी या दोन किल्ल्यांबरोबरच शिवडी किल्ल्याच्या डागडुजी, दुरुस्ती व देखभालीचे काम पालिकेने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी व किल्लेप्रेमींसाठी त्यांची आवडती व ऐतिहासिक वास्तू म्हणजे मुंबईतील किल्ले सुस्थितीत बघायला मिळणार आहे.

Shivdi fort will get past glory due to electric lighting system in the fort

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना मुंबईतील विविध पर्यटन स्थलांसोबतच आणखीन एक वेगळे पर्यटन स्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे. शिवडी येथील ऐतिहासिकव पुरातन वास्तू असलेल्या ‘शिवडी’ किल्ल्याची डागडुजी, दुरुस्ती करून व किल्ल्याभोवतीची तटबंदी अधिक मजबूत करण्यात येणार आहे. तसेच, किल्ल्याच्या परिसरात व आतमध्ये विद्युत रोषणाईची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

शिवडी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी खर्चण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने मुंबईतील माहिम, वरळी येथील किल्ल्यांची डागडुजी करून त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम हाती घेतले आहे. आता माहिम व वरळी या दोन किल्ल्यांबरोबरच शिवडी किल्ल्याच्या डागडुजी, दुरुस्ती व देखभालीचे काम पालिकेने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी व किल्लेप्रेमींसाठी त्यांची आवडती व ऐतिहासिक वास्तू म्हणजे मुंबईतील किल्ले सुस्थितीत बघायला मिळणार आहे.

मात्र या शिवडी किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर किल्ल्याची ढासळलेली तटबंदी व प्रवेशद्वार नव्याने उभारण्यात येणार आहे. विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या इतिहासावर आधारित माहितीपट लाईट साऊंड शो यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती नियुक्ती करण्यात येणार आहे. किल्ला परिसरात विद्युत रोषणाई व
दिशादर्शक फलक लावण्याची आणि नजीकच्या परिसरात पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.