घरताज्या घडामोडीटीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक TV च्या सीईओना अटक

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक TV च्या सीईओना अटक

Subscribe

टीआरपी रॅकेट प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्रात दाखल असलेल्या टीआरपी घोटाळ्यात आपल्या कर्मचार्‍यांना अटक करू नये, म्हणून रिपब्लिक चॅनेलची मालकी असणार्‍या एआरजी आऊटलायर या कंपनीने याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, टीआरपी रॅकेट प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

बनावट टीआरपी रॅकेटचा मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यामध्ये रिपब्लिक वृत्तवाहिनीसह दोन मराठी वाहिन्यांचा देखील समावेश होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ खानचंदांनी यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता त्यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे.

- Advertisement -

मुंबईत बसवण्यात आले २ हजार बॅरोमीटर

‘टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बरोबरीने ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या दोन वाहिन्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे आणि पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे’, असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा – महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रच लढणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -