घरमुंबईपालघर जिल्ह्यातील 203 गावे दुष्काळग्रस्त घोषित

पालघर जिल्ह्यातील 203 गावे दुष्काळग्रस्त घोषित

Subscribe

खरीप हंगामातील अंतीम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या पालघर जिल्ह्यातील 203 गावांना दुष्काळग्रस्त गावे म्हणून शासनाने घोषित केले आहे.पालघर जिल्ह्यातील वसई,जव्हार,मोखाडा या तीन तालुक्यातील ही गावे असून तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या वसई तालुक्याचाही त्यात समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरम झाल्यामुळे नैसर्गिक शेती आणि जंगले नष्ट होऊन त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची आणेवारी घसरल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार वसई तालुक्यातील 34 गावे दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आली असून त्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झालेल्या आचोळे,वालीव,पेल्हार, धानीव,बिलालपाडा या गावांसह मांडवी,चांदीप,देपीवली,मेढे,तिल्हेर,भिनार,टोकरे या जंगलपट्टीतील गावांचाही समावेश आहे.

अतिदुर्गम आणि आदिवासी तालुका म्हणून परिचित असलेल्या जव्हार तालुक्यातील 109 गावांनाही दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले आहे. कुपोषणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मोखाडा तालुक्यातील 60 गावांचाही त्यात समावेश आहे. या गावांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदि सुविधा शासनामार्फत देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -