घरमुंबईभाजप उपाध्यक्षपदी धनंजय महाडीक आणि चित्रा वाघ

भाजप उपाध्यक्षपदी धनंजय महाडीक आणि चित्रा वाघ

Subscribe

आयारामांना संधी, निष्ठावंतामध्ये नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत नुकतेच भारतीय जनता पार्टीत दाखल झालेले माजी खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चित्रा वाघ यांच्या भाजपकडून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता या दोघांवर प्रदेश उपाध्यक्ष पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाडिक यांच्यावर कोल्हापूरची जबाबदार देण्यात आली असून मुंबईच्या जबाबदारीची माळ चित्रा वाघ यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नव्या घोषणा गुरुवार केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीनंतर अनेक निकटवर्तियांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी अनेक महत्वपूर्ण पदांच्या नावाची घोषणा केली. यात प्रामुख्याने पक्षांच्या उपाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. यात कोल्हापूर आणि मुंबईसह सांगलीसाठी शेखर इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान आणि जनजागरण अभियानासाठी समिती नेमण्यात आली आहे. भाजपकडून लोकांमध्ये जाऊन या निर्णयाबाबत सांगितले जाणार आहे. ज्याच्या संयोजक पदाची जबाबादारी राजेश पंड्या यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याबरोबरच मुंबईसाठी संपर्क अभियान देखील राबविण्यात आली असून त्याची जबाबदारी मुंबईसाठी अनुक्रमे राजीव पांड्या, कोकणासाठी सुभाष काळे, पश्चिम महाराष्ट्रासाठी भरत पाटील, उत्तर महाराष्ट्रासाठी अरविंद जाधव, मराठवाड्यासाठी बसदराज मरंगळे यांची आणि विदर्भासाठी देवेंद्र दस्तुरे यांची निवड करण्यात आली आहे. तर जनजागरण अभियानासाठी मुंबईसाठी सुनील राणे, कोकणासाठी दीपक जाधव, पश्चिम महाराष्ट्रसाठी नामदेव ताकवणे, उत्तर महाराष्ट्रसाठी सुनील बच्छाव, मराठवाड्यासाठी राम कुलकर्णी आणि विदर्भासाठी शिवराय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -