घरमुंबईवाशी खाडीपूल की सुसाईड पॉइंट?

वाशी खाडीपूल की सुसाईड पॉइंट?

Subscribe

आत्महत्येच्या प्रयत्नाच्या दोन घटना

वाशी खाडीपुलावरून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. अलीकडेच दोन जणांनी या पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्या केली. सोमवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास जुईनगरमध्ये राहणार्‍या रेखा परमेश्वरी यांनी वाशी खाडीपुलावरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी खाडीत मासेमारी करणार्‍या मच्छीमारांनी त्यांना वाचवले. ही घटना ताजी असताना पुन्हा वांद्रे येथे राहणार्‍या संजय पुजारा यांनी सोमवारी रात्रीच 8 च्या सुमारास खाडीपुलावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह आढळला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नसावी असा अंदाज वाशी पोलिसांकडून लावला जात असून, केवळ बेपत्ता होण्याची तक्रार नोंद झाली आहे.

पहिल्या घटनेतील रेखा परमेश्वरी यांच्यावर महापालिका रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून, अद्याप त्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रेखा यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

तर संजय पुजारा हे मुंबईतील वांद्रे येथील रहिवासी असून, रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते वाशी खाडी पुलावर येऊन थांबले होते. स्कूटी पुलावर उभी करून त्यांनी खाडीत उडी मारली. खाडीत उडी मारण्याआधी संजय पुजाराने मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला होता की, मी कर्जात बुडालो आहे. शिवाय, आजारीही आहे. त्यामुळे मी वाशी खाडी पुलावरून उडी मारणार आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी पुजाराची स्कूटी पुलावरून ताब्यात घेतली. मात्र, पुजारा सापडले नाहीत. स्कूटीमधील पाकिटात आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि सुसाईड नोट सापडली. त्याचसोबत एक मोबाइलही सापडला आहे. पुजारा यांनी खाडीत उडी मारल्याचे काही जणांनी पाहिल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून त्यांचा मंगळवारीही शोध सुरू होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -