घरताज्या घडामोडीCorona Effect - करोनामुळे रेल्वेचे १०० कोटींचे नुकसान!

Corona Effect – करोनामुळे रेल्वेचे १०० कोटींचे नुकसान!

Subscribe

मुंबईची जीवनवाहिनी बंद असल्याने १०० कोटींचे नुकसान

करोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. तसेच सार्वजनिक वाहतूक मध्ये मुंबईची जीवन वाहिनी असणारी मुंबई लोकलला २३ मार्च ते ३१ मार्चपर्यत बंद असल्याने प्रवासी वाहतुकीतून मिळणारे तब्बल ६० कोटीचं नुकसान होणार आहे. तसेच इतर माध्यमातून मिळणारे महसूल सुद्धा बुडणार आहे. मार्च महिना उपनगरी रेल्वे सेवेला सरासरी १०० कोटींचा आर्थिक फटका बसणार आहे. अशी माहिती रेल्वे मंडळाचा सूत्रांनी दिली आहे.

आधी तोट्यात असणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेचा उपनगरीय लोकल सेवेला करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. देशासह महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव अधिक होऊ नये, याकरता आता महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून सुद्धा  ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये मुंबईची जीवनवाहिनी  उपनगरीय लोकल सेवाचा समावेश आहे.

- Advertisement -

यापुर्वी करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रवासात गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या आवाहनाचे पालन नागरिक करत असल्याचे दिसून आले आहे. लोकलची १८ लाखानी प्रवासी संख्या घटली होती. मात्र आता २३ मार्चपासून सर्व लोकल गाड्या रद्द केल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

अशी आहे लोकलची परिस्थिती

मध्य रेल्वेवर दररोज १७३२ लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. तर पश्चिम रेल्वेवर १३१३ लोकल फेर्‍या चालविण्यात येतात. प्रत्येक दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेचा उपनगरीय लोकल सेवेतून तब्बल ८० लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या मार्च महिन्याची आकड्यांचा अभ्यास केला तर असे निर्दशनात येते की, मध्य रेल्वेवर उपनगरीय लोकल मधून ११ मार्च २०२० रोजी ६७ लाख ६८ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेला महसूल ३ कोटी ६४ लाख ६४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. नंतर २१ मार्चपर्यत कमालीची प्रवासी संख्या घटली आहे.  त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर ३ मार्च २०२० रोजी तब्बल ४५ लाख ५४ हजार प्रवाशांनी लोकल सेवेतून प्रवास केलेला होता त्यातून पश्चिम रेल्वेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा महसुल मिळाला होता.

- Advertisement -

असं होणार नुकसान 

रेल्वेमार्गावरील उपनगरीय लोकल सेवेला २३ मार्च ते ३१ मार्च पर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे. ९ दिवस लोकल बंद असल्यामुळे मध्य रेल्वे सरासरी ३२  कोटी ७९  लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. तर पश्चिम रेल्वेला या बंद काळात २७  कोटी १६  लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. ३१ मार्चपर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वेला ५९  कोटी ९५  लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. जाहिरात आणि इतर माध्यातून येणाऱ्या महसूलात सुद्धा घट होणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -