Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमGood News : फसवणुकीची 1.31 कोटींची रक्कम वाचविण्यात यश; सायबर सेलची उल्लेखनीय...

Good News : फसवणुकीची 1.31 कोटींची रक्कम वाचविण्यात यश; सायबर सेलची उल्लेखनीय कामगिरी

Subscribe

गेल्या 24 तासांत ऑनलाईन फसवणुकीची 1 कोटी 31 लाख रुपयांची फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : गेल्या 24 तासांत ऑनलाईन फसवणुकीची 1 कोटी 31 लाख रुपयांची फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. ही रक्कम संबंधित तक्रारदाराच्या बॅंक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. (1.31 crores of fraud was saved; remarkable achievement of cyber cell)

बुधवारी मरिनड्राईव्ह येथील एका खासगी कंपनीच्या मालकाची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केली होती. त्यांना काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्या बतावणीला भुलून त्यांनी सुमारे 85 लाख रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. फसवणुकीचा हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला होता. अशाच प्रकारे इतर काही गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी विविध तक्रारदारांची फसवणूक करुन त्यांच्या सुमारे 46 लाख रुपयांचा अपहार केला होता. याबाबत संबंधितांनी सायबर सेल हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीची सायबर सेल पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला होता. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, बावस्कर, अंमलदार माने, पाटील, राऊळ, वालवलकर व अन्य पोलीस पथकाने तांत्रिक माहितीवरुन संबंधित बँक खात्याची माहिती काढली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : नसीम खान यांची ईव्हीएमवर शंका; फेर मोजणीसाठी मोजले एवढे लाख रुपये

या बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगून संबंधित बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. या विनंती या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्यात आले. बँक खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्यात आली होती. ही रक्कम आता संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. गेल्या 24 तासांत 1 कोटी 31 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम वाचविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी फसवणुक झालेल्या तक्रारदारांना कौतुक केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bangladesh ISKCON : बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार; सरकारला फटकारले


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -