Homeक्राइमFraud : 1.76 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा; फ्लॅटच्या पैशांचा केला अपहार

Fraud : 1.76 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा; फ्लॅटच्या पैशांचा केला अपहार

Subscribe

दादर येथे राहणार्‍या एका बांधकाम व्यावसायिक महिलेची 1 कोटी 76 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मिनी जोसेफ वरीकेसरी या वयोवृद्ध महिलेविरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटच्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन तिने तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मुंबई : दादर येथे राहणार्‍या एका बांधकाम व्यावसायिक महिलेची 1 कोटी 76 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मिनी जोसेफ वरीकेसरी या वयोवृद्ध महिलेविरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटच्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन तिने तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. (1.76 crore fraud case against woman; money for flat embezzled)

तक्रारदार महिला ही दादर येथे राहत असून ती बांधकाम व्यावसायिक आहे. तिच्याच शेजारच्या फ्लॅटमध्ये मिनी ही पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिने तिच्या फ्लॅटची तक्रारदार महिलेला विक्री केली. या फ्लॅटसाठी तिने तिच्याकडून 1 कोटी 76 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम तिने बॅंकेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी घेतली होती. पेमेंट मिळाल्यानंतर तिने तक्रारदार महिलेला तिच्या फ्लॅटचा ताबा दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Rats And Mice Stolen : धक्कादायक ! हरयाणात चक्क उंदरांची चोरी; 3500 चिचुंद्र्या गायब; पोलीसही हैराण

मात्र मिनी आणि तिचा पती जोसेफ यांनी गृहकर्जाची परतफेड न करता या पैशांचा परस्पर अपहार केला. वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर करुन या दोघांनी तिची फसवणूक केली. चार महिन्यानंतर तिला बँकेने फ्लॅटवर जप्ती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिने दुसर्‍या बँकेतून गृहकर्ज घेऊन तिचे कर्ज फेडले होते. अशा प्रकारे तिला तो फ्लॅट सुमारे चार कोटींना पडला होता.

- Advertisement -

जोसेफ आणि मिनीकडून झालेल्या फसवणुकीनंतर तिने माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मिनीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जोसेफ याचे जून 2024 रोजी निधन झाले. तपासात या दोघांनी तक्रारदार महिलेकडून घेतलेल्या पैशांतून लोअर परेल येथे एक फ्लॅट घेतला होता. उर्वरित रक्कम दोन्ही मुलांना शैक्षणिक आणि इतर कामासाठी वापरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा – Mumbai Boat Accident : मुंबईत पुन्हा एकदा बोटीचा अपघात; नेमकं काय घडलं?


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -