घरक्राइम1 कोटी 34 लाखांचा चोरीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत !

1 कोटी 34 लाखांचा चोरीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत !

Subscribe

गोरेगाव ते दहिसर दरम्यान चालू वर्षांत सोन्याचे दागिने, वाहनचोरी अशा मुद्देमालाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता.

मुंबई : वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला 1 कोटी 34 लाख रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी उत्तर प्रादेशिक विभागाच्या वतीने मालमत्ता प्रदान सोहळ्यादरम्यान तक्रारदारांना परत करण्यात आला. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने 84 तक्रारदारांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. गोरेगाव ते दहिसर दरम्यान चालू वर्षांत सोन्याचे दागिने, वाहनचोरी अशा मुद्देमालाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता.

जप्त केलेला मुद्देमाल लोकल कोर्टाच्या आदेशाने तक्रारदारांना परत करण्यासाठी शुक्रवारी उत्तर प्रादेशिक विभागाच्या वतीने मालमत्ता प्रदान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत 84 तक्रारादारांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. 1 कोटी 34 लाख रुपयांचा हा मुद्देमाल परत मिळाल्याने या तक्रारदारांना मुंबई पोलिसांकडून एक अनोळखे गिफ्ट मिळाल्याची भावना होती. त्यात चोरीस गेलेले बाईक, रिक्षा, कार, सोन्या-चांदीचे दागिने आदीचा समावेश होता. 2003 आणि 2005 साली काही सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. ते दागिनेही शुक्रवारी पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केले होते.

- Advertisement -

मालाड येथे राहणार्‍या महिलेच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली होती. या गुन्ह्यांतील सर्व दागिने या महिलेला कार्यक्रमादरम्यान परत करण्यात आले होते. यावेळी तिने पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले. एका तक्रारदाराची कार चोरीस गेली होती. ही कार पोलिसांनी 24 तासात शोधून काढली. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -