राष्ट्रपतींनी १० अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयात एकूण न्यायाधीशांची संख्या ९४ आहे, पण सध्या केवळ ६२ न्यायाधीश कार्यरत असून ३२ न्यायाधीशांची कमतरता आहे.

bombay high court

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम १ ने बहाल केलेल्या अधिकारांनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या दहा अतिरिक्त न्यायाधीशांची पदोन्नती करून त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी, न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर, न्यायमूर्ती मिलिंद नरेंद्र जाधव, न्यायमूर्ती मुकुंद गोविंदराव सेवाळीकर, न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग ज्ञानसिंह बिष्ट, न्यायमूर्ती देवद्वर बालचंद्र उग्रसेना, न्यायमूर्ती सुरेंद्र बाळचंद्र, न्यायमूर्ती सुरिंदर पंढरीनाथ तावडे आणि न्यायमूर्ती रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दहा अतिरिक्त न्यायाधीशांची पदोन्नती करून त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली.

सध्या केवळ ६२ न्यायाधीश कार्यरत  

यासंदर्भातील अधिसूचना आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली. अतिरिक्त न्यायाधीश हे सहसा दोन वर्षांसाठी नियुक्त केले जातात आणि त्यानंतर त्यांना कायम न्यायाधीश म्हणून पदोन्नती दिली जाते. न्याय विभागाच्या वेबसाइटनुसार, मुंबई उच्च न्यायालयात एकूण न्यायाधीशांची संख्या ९४ आहे, पण सध्या केवळ ६२ न्यायाधीश कार्यरत असून ३२ न्यायाधीशांची कमतरता आहे.