घरमुंबईमहालक्ष्मी येथून डंपिंगवर कचरा टाकण्यासाठी १० कोटींचा खर्च

महालक्ष्मी येथून डंपिंगवर कचरा टाकण्यासाठी १० कोटींचा खर्च

Subscribe

मुंबई महापालिका महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा वाहनाने उचलून डंपिंग ग्राउंडवर टाकण्यासाठी कंत्राटदारावर दोन वर्षांत १० कोटी रुपये खर्चणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुंबईत सध्या दररोज विविध प्रकारचा ६,५०० मेट्रिक टन इतका कचरा डंपिंग ग्राउंडवर जमा होतो. हा कचरा ओला, सुका, ग्रीन, भंगार कचरा, ई – कचरा , कपडे, चिंध्या, डेब्रिज आदी स्वरूपातील आहे. पालिका कंत्राटदारामार्फत फक्त ‘जैविक कचरा’ नीटपणे गोळा करून त्याची विल्हेवाट ज्वलनशील भट्टीमध्ये लावण्यात येते. मात्र इतर कचरा दररोज मिक्स स्वरूपात डंपिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. देवनार व कांजूर डंपिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली असून ते बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. यापुढे मुंबईतील कचरा मुंबई बाहेरील डंपिंगवर टाकण्याचे नियोजन आहे.

दररोज ६०० मेट्रिक टन इतका कचरा होता जमा

मुंबई महापालिका एकीकडे विविध उपाययोजना केल्याचे कारण सांगत कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत असले तरी सत्यता पालिकेलाच माहिती. कचऱ्याचे सर्व आकडे हे कागदावरील आहेत. मुंबई शहर भागातील ए बी सी डी ई एफ/ दक्षिण, एफ/ उत्तर, जी/ दक्षिण आणि जी/ उत्तर या विभागातील कचरा कंत्राटदारांच्या मिनी कॉम्पॅक्टरद्वारे गोळा करून महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्रात आणण्यात येतो. तेथून तो कचरा मोठया बंदिस्त कॉम्पॅक्टरद्वारे देवनार व कांजूर डंपिंग ग्राउंड येथे विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येतो. महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रात दररोज ६०० मेट्रिक टन इतका कचरा जमा होतो. तेवढा कचरा दररोज डंपिंगवर टाकण्यात येतो. गतवर्षी मे.के.के. कॅरियर या कंत्राटदाराला या कामासाठी प्रति मेट्रिक टन २५९ रुपये याप्रमाणे २ लाख ३७ हजार २५० मेट्रिक टन कचऱ्याच्या वाहतुकीसाठी एकूण ६ कोटी १४ लाख ४७ हजार ७५० रुपये खर्चण्यात आले होते.

- Advertisement -

तर यावेळी दोन वर्षासाठी (७३० दिवस) प्रति मेट्रिक टन कचऱ्यासाठी मे. सिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंत्राटदाराला २२३.४७ रुपयेयाप्रमाणे ४ लाख ३८ हजार मेट्रिक टन कचऱ्यासाठी १० कोटी १७ लाख ९५ हजार ५४ रुपये (४% सादिलवार ३९.१५ लाख रुपये) देण्यात येणार आहेत.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -