Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMumbai News : मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये पुढील पाच दिवस पाणीकपात; कारण काय?

Mumbai News : मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये पुढील पाच दिवस पाणीकपात; कारण काय?

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये आज, शनिवारी (30 नोव्हेंबर) अचानकपणे तांत्रिक बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण  झाल्यानंतर दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका जल अभियंता खात्याकडून करण्यात आले आहे. (10 percent water reduction in Mumbai Thane and Bhiwandi for the next five days)

न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यासाठी जल अभियंता खात्याकडून 1 आणि 2 डिसेंबर 2024 रोजी तातडीने काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह मुंबई महापालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यात; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता, शिंदेंची नाराजी भोवणार?

- Advertisement -

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर तर ठाणे, भिवंडी, निजामपूर महापालिका क्षेत्राला दररोज 180 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या दररोजच्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे अंदाजे दररोज 400 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा कमी करण्यात येणार आहे.

सदर काम पूर्ण झाल्यावर मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर महापालिका क्षेत्रातील दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत मुंबईकर, ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका जल अभियंता खात्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -