Corona Update: अंधेरीतील रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोनाबाधित!

10 Staff of Radha Krishna Restaurant Test Positive For Coronavirus in andheri
Corona Update: अंधेरीतील रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोनाबाधित!

मुंबईसह राज्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधित संख्या वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत एक हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. दरम्यान मुंबईतील अंधेरीमधील रेस्टॉरंटमध्ये १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या बाधित कर्मचाऱ्यांना बीकेसीमधील कोविड जम्बो रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

अंधेरी पश्चिम येथील एस.वी रोडवर असणाऱ्या राधा कृष्ण रेस्टॉरंटमध्ये १० कर्मचाऱ्यांची कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली. यापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर हॉटेल सीन करण्यात आले होते. हा घटनेच्या आठवडाभरानंतर अंधेरीत हा प्रकार घडला आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, काल (गुरुवारी) मुंबईत १ हजार १०३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २९ हजार ८४२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ७ हजार २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १० हजार ४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा रेट २३८ दिवस आहे. ३ मार्चपर्यंत ३३ लाख ५३ हजार १२४ कोरोनाच्या टेस्ट झाल्या आहे. काल पासून निम्नलिखित १३ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणाच्या मोहीमेस प्रारंभ झाला आहे.


हेही वाचा – नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक! लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी प्रशासनाची घ्यावी लागणार परवानगी