घरताज्या घडामोडीCoronaVirus: मुंबईतील वरळी, डिलाईरोड बीडीडी चाळ १०० टक्के लॉकडाऊन!

CoronaVirus: मुंबईतील वरळी, डिलाईरोड बीडीडी चाळ १०० टक्के लॉकडाऊन!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. दरम्यान आता मुंबईतील वरळी आणि डिलाईरोड बीडीडी चाळ १०० टक्के बंद ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. लोक लॉकडाऊनचं पालन करत नसल्यामुळे तसंच पोलिसांचे देखील ऐकत नसल्यामुळे हा निर्णय मुंबईच्या महापौर यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांना पत्र दिलं आहे.

मुंबईतील बीडीडी चाळीत सतत कोरोनाबाधित रुग्ण मिळतं आहे. त्यामुळे बीडीडी चाळीत संपूर्ण बिल्डिंग बंद करण्यात येत आहे. यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. दरम्यान अनेक लोक पोलिसाचं देखील ऐकत नसल्यामुळे वरळी आणि डिलाईरोड बीबीडी चाळ १०० टक्के बंद ठेवण्यासाठी महापौरांनी पोलिसांना पत्र दिलं आहे.

- Advertisement -

घरात काही खायला नाही

विशेष म्हणजे वरळीतील प्रत्येक बी.डी.डी चाळ आता सिल होत असून लोकांना खालीही उतरता येत नाही. हाती पैसा असूनही ना घरात सिलेंडर आणता येत ना त्यांना घरपोच दिला जात. घरात काही खायला नाही. राजकीय पक्षांकडूनही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात असले लहान मुलांसाठी खाऊ बिस्कीटेही आणता येत नाही. अनेक इमारतींमध्ये लहान मुलांचे भुकेपोटी हाल होत आहे. घरात तेल नाही कि साखर. मग जेवण करायचे कसे असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमदारांनी कोळीवाड्यातील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असले तरी त्यांचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे बीडीडी चाळीतील लोकांकडे लक्ष नाही. ज्या पॅटर्नची चर्चा केंद्रीय स्तरावर होत आहे, मग त्याच विभागातील बीडीडी चाळींमध्ये याचा अवलंब का केला जात नाही? असा सवाल मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी केला होता. आज जिजामाता नगर, मरिअम्मा नगर येथेही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हा वरळीचा पॅटर्न तिथे का राबवला जात नाही. एवढेच कशाला लोअर परळमधील काही इमारतीकडेही या लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे धुरी यांनी सांगितलं होत.


हेही वाचा – Coronavirus: मुंबईत आज ५१० नवे रुग्ण, बाधितांची संख्या ९,१२३ वर

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -