घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत सोमवारी १ हजार ८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Corona Update: मुंबईत सोमवारी १ हजार ८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबई पुन्हा कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट बनत आहे. मुंबईत दररोज १ हजारांच्या घरात नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईच्या आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागल्या आहेत. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात ८ ते १० दिवसांनी पून्हा आढावा घेत मुंबईत अंशत: लॉकडाऊन लावले जाण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. याचत मुंबईत आज (८ मार्च) सांयकाळी 6 वाजेपर्यंत १ हजार ८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या १० हजार ७७९ इतकी आहे. याशिवाय २४ तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९५६ इतकी आहे. आजवर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ११ हजार ४०७ आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर २२५ दिवस आहे. तसेच कोविड वाढीचा दर (१ मार्च-७ मार्च) ०.३१ टक्के आहे. मुंबईत आजवर ३ लाख ३४ हजार ५७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात ९५६ रुग्ण बरे झाले असून ३ लाख ११ हजार ४०७ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १० हजार ७७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत आज ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ५०४ वर पोहचली आहे. सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के असून दुप्पटीचा दर २३७ दिवस आहे. ७ मार्चपर्यंत मुंबईत ३४ लाख ३४ हजार ६१० कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील अजूनही १९३ इमारती सीलबंदी आहेत. तसेच २० सक्रिय कंटनमेंट झोन आहेत.

- Advertisement -

हेही वाचा- कोरोनामुळे आतापर्यंत पालिकेच्या १९१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू


 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -