Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण आज १ हजारांनी कमी झाले पण मृत्यू संख्या वाढली

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 9 लाख 91 हजार 967 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या ही 16 हजार 446 इतकी आहे. मुंबईत आज एकूण 54हजार 558 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 10 हजार 661 रुग्णांच्या चाचण्या पॉजिटीव्ह आल्या आहेत.

10,661 new corona patients found in mumbai today 11 death
Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण आज १ हजारांनी कमी झाले पण मृत्यू संख्या वाढली

मुंबईतील मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत मागील 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजारांनी कमी झाली असून मुंबईत आज शनिवारी 10 हजार 661 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत 11 हजार 317 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र आज हा आकडा किंचिंत खाली आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र आज वाढ झाल्याचे दिसून आले. आज मुंबईत ११ जाणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. काल हीच संख्या ९ इतकी होती.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 9 लाख 91 हजार 967 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या ही 16 हजार 446 इतकी आहे. मुंबईत आज एकूण 54हजार 558 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 10 हजार 661 रुग्णांच्या चाचण्या पॉजिटीव्ह आल्या आहेत. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ 722 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 111 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईत दररोज नोंदवण्यात येणाऱ्या रुग्णांपैकी फार कमी रुग्ण हे रुग्णालयात दाखल होत आहेत.

मुंबईचा रिकव्हरी रेट हा 91 टक्के इतका आहे. तर 8 जानेवारी ते14 जानेवारी दरम्यान कोरोना रुग्ण वाढीचा दर हा 1.56 टक्के इतका झाला आहे. मुंबईत सध्या शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 58 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. त्याचप्रमाणे 16 हजार 446 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona In India: देशात रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम! २४ तासांत २,६८,८३३ नव्या रुग्णांची भर, पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर