घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,११८ नवे रुग्ण, ६० जण मृत्यूमुखी!

Corona Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,११८ नवे रुग्ण, ६० जण मृत्यूमुखी!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ११८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ११ हजार ९६४वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार २४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

आज झालेल्या मृत्यूपैकी ४३ रुग्ण पुरुष आणि १७ रुग्ण महिल्या होत्या. तसेच यापैकी ४२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ४८ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबई आज ८६७ संशयीत रुग्ण भरती झाले असून संशयीत रुग्णांचा आकडा ७९ हजार २०४वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. २८ जुलै पर्यंत मुंबई ५ लाख ५ हजार ९८२ कोविड-१९ चाचण्या झाल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील दुप्पटीचा दर ७२ दिवसांवर गेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: चिंता वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -