Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख; आज ११,३१७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ८१ हजार ३०६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

11317 new corona patient found and 9 death in today mumbai
Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख; आज ११,३१७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत कमी भर पडताना दिसत आहे. काल, गुरुवारी मुंबईत १३ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन गेल्या २४ तासांत मुंबईत ११ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ८१ हजार ३०६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ८४ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात मुंबईत २२ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ८ लाख ७७ हजार ८८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज आढळलेल्या ११ हजार ३१७ रुग्णांपैकी ८४ टक्के रुग्ण म्हणजे ९ हजार ५०६ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. आज दिवसभरात ५४ हजार ९२४ नमुन्यांची चाचणी झाली असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख १० हजार ४३८ चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईत आज मृत्यू झालेले ९ रुग्ण दीर्घकालीन आजारी होती. यातील ६ रुग्ण पुरुष आणि ३ रुग्ण महिला होत्या. २ रुग्णांचे वय ४० वर्षांवर होते. तर १ रुग्णाचे वय ४० ते ६० वर्षादरम्यान आणि उर्वरित ६ रुग्ण ६० वर्षांवरील होते. मुंबईत रिकव्हर रेट ८९ टक्के झाला असून रुग्ण दुप्पटीचा दर ३९ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत ६५ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनावर मात करण्याचे हत्यार मिळाले भांग, गांज्यात?; पण वैज्ञानिक म्हणाले…