Corona Update : मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण; तर ४६ जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १३२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३१ हजार ५४२ इतकी झाली आहे.

Mumbai Corona Update 961 corona victims recorded in Mumbai in one day its fourth wave of corona
Mumbai Corona Update : कोरोनाच्या चौथ्या लाटेला निमंत्रण, मुंबईत एका दिवसात ९६१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १३२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३१ हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६ हजार ५७ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १७ हजार ९१७ इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार २६५ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के

मुंबईत आज झालेल्या मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३२ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाच्या ८६४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १ लाख ६ हजार ५७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. तर शहरात १७ हजार ९१७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण

दरम्यान, आज राज्यात १३,१६५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आज ३४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ % एवढा आहे. तर आज ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ४,४६,८८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.०९ % एवढे झाले आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण; ३४६ जणांचा मृत्यू