Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबईत आज आढळलेल्या ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांपैकी ९ हजार ६६७ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. आज दिवसभरात एकूण ८५१ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

11647 new patient found and 2 deaths in 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख आता उतरताना दिसत आहे. मुंबईत काल, सोमवारी ५ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. तर आज, मंगळवारी मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर दिवसभरात १४ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या मुंबईत १ लाखांहून अधिक रुग्ण सक्रीय आहेत.

मुंबईत आज आढळलेल्या ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांपैकी ९ हजार ६६७ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. आज दिवसभरात एकूण ८५१ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ३९ हजार ८६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला असून ८ लाख २० हजार ३१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १ लाख ५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज दिवसभरात ६२ हजार ९७ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ४३ लाख २५ हजार १४४ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ३६ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नसून ६३ सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Coronavirus : आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव ; २७ कैद्यांना कोरोनाची लागण