घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत Lockdown अटळ, कोरोना रुग्णांनी पार केला हजाराचा आकडा

Corona Update: मुंबईत Lockdown अटळ, कोरोना रुग्णांनी पार केला हजाराचा आकडा

Subscribe

मुंबईतील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांचा तुलनेत मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार १६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २१ हजार ६९८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ३७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख १ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत ८ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.२४ टक्के इतका आहे. २३ फेब्रुवारी पर्यंत मुंबईत कोरोनाच्या एकूण चाचण्या ३२ लाख ८५ हजार ३३४ झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर २९४ दिवस आहे.

- Advertisement -

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत ३७ दिवसांनंत कोरोनाबाधितांची दुप्पट वाढ झाली आहे. आज दिवसभरात १० नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले असून धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ४१वर पोहोचली आहे. दादरमध्ये आज दिवसभरात ५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली तर माहिम १० नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ७८५वर तर माहिममधील ४ हजार ६५८वर पोहोचली आहे.


हेही वाचा – राज्यात कोरोनाचा उद्रेक; दुसऱ्या लाटेसाठी FDA सज्ज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -