Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १८० नव्या रूग्णांची वाढ

highest single day spike of 178 deaths reported in maharashtra today

मुंबईमध्ये १ हजार १८० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार ८१४ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४ हजार ८२७ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार १८० नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४६ पुरुष तर ५२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४१ जण हे ६० वर्षांवरील, तर २४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ६८ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९६६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजार ४८७ वर पोहोचली आहे. तसेच १०७१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ५३ हजार ४६३ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा –

कोरोनासह पावसाळ्यातील आजारांशी मिळून मुकाबला करा – मुख्यमंत्री