घरमुंबईअकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेत गोंधळ

अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेत गोंधळ

Subscribe

कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळूनही काही विद्यार्थ्यांचे के. सी. महाविद्यालयाच्या प्रथम मेरिट लिस्टमध्ये नाव आले नाही. विद्यापीठाची ऑनलाइन प्रक्रिया फोल ठरताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीत जास्त गुण मिळाले असले तरी विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याची दहावीला उत्तम गुण मिळवून नामांकित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर विद्यार्थी उत्तम गुणही संपादन करतात. परंतु, मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना हव्या असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाताना दिसत नाही. गुरुवारी मुंबईच्या के. सी. महाविद्यालयाच्या द्विलक्षी अभ्यासक्रमाची (बायोफोकल कोर्स) पहिली मेरीट लिस्ट जाहीर केली. मेरीट लिस्टच्या कट ऑफ पेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

पालकांची शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार

कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळूनही यादीत आपल्या पाल्याचे नाव न आल्यामुळे २० पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींमुळे कट ऑफ लीस्टमध्ये नाव न आल्याचे सांगितले. पुढच्या कट ऑफ लीस्टमध्ये नाव येईल अशी शक्यता त्यांनी वर्तविली. दरम्यान, पालकांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार केली आहे.

- Advertisement -

कॉम्प्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल मेंटेनन्स या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी के. सी. महाविद्यालयाने जाहीर झालेली प्रथम कट ऑफ लीस्ट ही अनुक्रमे ९०.६६ टक्के, ८२.६० टक्के आणि ८७.४० टक्के अशी होती. परंतु, बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळूनही त्यांचे नाव यादीत आलेले नाही.

मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलताना एका पालकाने सांगितले की, ‘माझ्या मुलीला ICSE मध्ये ९४ टक्के मिळाले. तरीही के. सी. महाविद्यालयाच्या पहिल्या यादीत तीचे नाव आले नाही. मी चौकशीसाठी के. सी. महाविद्यालयातही जाऊन आले. परंतु, तिथेही नोटीस बोर्डवर लावलेल्या यादीत मुलीचे नाव दिसले नाही.’

- Advertisement -

काही पालकांनी नगरसेविका मिनल पटेल यांच्या मार्फत शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रा. राजेंद्र अहिरे यांची भेट घेतली. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्याचे आणि वेळ प्रसंगी चर्चगेटच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

७३ विद्यार्थी या समस्येला बळी

एका पालकाने सांगितले की, ‘आमच्या मुलांना प्रवेश मिळण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याचे लेखी निवेदन देण्यात आले नाही’. के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता बागला यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, ‘जवळ जवळ ७३ विद्यार्थ्यांना अशा समस्येला सामोरे जावे लागत आहे’. दरम्यान के. सी. महाविद्यालयाने जाहीर केलेल्या कट ऑफ लीस्टमधील १२५ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

बायोफोकल कोर्स म्हणजे काय?

विज्ञान शाखेसाठी अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेसाठी पर्याय उपलब्ध असतो. या पर्यायानुसार ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा अभियांत्रिकी शिक्षणामध्ये बारावीनंतर शिक्षण करायचे असते, त्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी या विषयाला पर्याय असतो. याच अभ्यासक्रमाला बायोफोकल कोर्स असे म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -