महाविकास आघाडीच्या बैठकीला 12 अपक्ष आमदार उपस्थित, मुख्यमंत्री म्हणाले…

12 MLAs present at the meeting of Mahavikas Aghadi

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक हॉटेल ड्रायटंडमध्ये बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते. या बैठकीच्या निमीत्ताने महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन दिसून आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर मुंबईत जल्लोष करू, कोणीही कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार दिल्लीत निवडून जाणार, असा विश्वास व्यक्त केला. तर महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकून आणा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री –

सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. 22-23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती हे आठवावं लागतं. त्यामुळे सभ्यता पाळायाला हरकत नव्हती, असं मुख्यमंत्री म्हणाले. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच असा दावा केला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी यावेळी आमदारांना काय संबोधन केले असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर असं संबोधन सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचवेळी कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असा विश्वासही व्यक्त केला.

या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते एच के पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांची हॉटेल ड्रायडंटवर बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करायचे याबाबत माहिती देण्यात आली.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी अपक्ष आणि इतर संघटनांच्या आमदारांचा मत फार महत्वाचे आहे. महाविकासआघाडीला 12 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आहे.

हे अपक्ष आमदार उपस्थित –

विनोद निकोले

राजकुमार पटेल

शामसुंदर शिंदे

देवेंद्र भुयार

मंजुळा गावित

नरेंद्र बोंडेकर

किशोर जोरगेवार

अशिष जयस्वाल

विनोद अग्रवाल

संजय मामा शिंदे

गिता जैन

चंद्रकांत पाटील

येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. पण 6 व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या जागेसाठी भाजप कडे 29 मतं शिल्लक राहतात. भाजप तिसरा उमेदवार जिंकण्यासाठी 13 मतांची गरज आहे. तर दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडे 13 मतं शिल्लक राहतात, कॉंग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहतात. महाविकास आघाडीला 12 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे.