घरCORONA UPDATECoronaVirus: कस्तुरबामधील उपचार घेणारे १२ रुग्ण व्हायरस फ्री!

CoronaVirus: कस्तुरबामधील उपचार घेणारे १२ रुग्ण व्हायरस फ्री!

Subscribe

पालिकेने करून दाखवले आहे. कस्तुरबातील करोनाचे १२ रुग्ण बरे झाले. लवकरच त्यांना डिस्चार्ज देणार आहेत.

जगभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा हॉस्पिटलमधील १२ रुग्ण करोनाच्या व्हायरसपासून मुक्त झाले आहेत. या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच या व्हायरसची लागण झाल्यास थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.

लवकरच डिस्चार्ज दिला जाणार

सध्या राज्यात १०१ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, मुंबईसह उपनगरांत आतपर्यंत ३८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी अनेक रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा आणि इतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशातच मुंबईमध्ये उपचारांवर असणाऱ्या १२ रुग्णांच्या दुसऱ्या टप्प्यांतील चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असे ही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यश

राज्यात एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा आणि इतर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या काही दिवसात करोना व्हायरसची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते करोना निगेटिव्ह आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या १२ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.

५२ पैकी १२ रुग्ण व्हायरस फ्री

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ पैकी १२ रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत. या रुग्णांच्या २४ तासात पाठोपाठ केलेलया दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. अशावेळेस आम्ही त्यांना व्हायरस फ्री असं म्हणतो. म्हणजे आतापर्यंत जेवढे रुग्ण दाखल आहेत त्यापैकी १२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जी दिलासादायकबाब म्हणावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: पुण्यात तीन नवे रुग्ण तर साताऱ्यात एक नवा रुग्ण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -