घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत कोरोनाचे १२०० नवे रुग्ण; तर ४८ जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत कोरोनाचे १२०० नवे रुग्ण; तर ४८ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये १ हजार २०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २७ हजार ५७१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ९८८ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये १ हजार २०० नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३० पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर ९ जण हे ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या ८८४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल एक लाख ९५४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे. तर शहरात १९ हजार ३३२ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा –

दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा ६ ऑक्टोबरपासून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -