घरमुंबईशहापूर तालुक्यात 12 हजार मतदारांनाच मिळाले स्मार्टकार्ड

शहापूर तालुक्यात 12 हजार मतदारांनाच मिळाले स्मार्टकार्ड

Subscribe

दोन लाख, ४८ हजार ७०८ मतदार स्मार्टकार्डविना

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेतील एकूण 2 लाख 48 हजार 708 मतदारांपैकी केवळ 12 हजार मतदारांनाच शहापूर निवडणूक विभागातून मतदार स्मार्ट ओळखपत्र दिले गेले आहे. त्यामुळे या स्मार्ट कार्डपासून अनेक मतदार वंचित राहिले असून विशेष म्हणजे पाच वर्षांत केवळ 30 हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

विधानसभा निवडणुका जवळ आल्या तरी स्मार्ट कार्ड बाबत शहापूर निवडणूक विभागाने वेळेवर जनजागृती केली नाही. मतदान केंद्र स्तरीय अधिकार्‍यांनी मतदारांचे स्मार्ट कार्डसाठी फॉर्म वेळेवर न भरल्याने मतदार स्मार्ट कार्ड पासून वंचित राहिले आहेत. फॉर्म न भरल्याने किंवा याबाबत सामान्य मतदाराला निवडणूक विभागातून वेळेवर माहिती न मिळाल्याने निवडणुकीआधी अनेकांची मतदारांची स्मार्ट कार्ड तयार होऊ शकली नाहीत. परिणामी स्मार्ट कार्ड न मिळाल्याने अनेक मतदारांना आता जुनेच कार्ड मतदान करताना वापरावे लागणार आहे.

- Advertisement -

पाच वर्षांत केवळ 30 हजार मतदारांचीच नोंदणी
शहापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत केवळ 30 हजार मतदारांची नव्याने नोंदणी येथील निवडणूक विभागात झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.एम. दलाल यांनी दिली. 2014 वर्षी विधानसभेला एकूण 2 लाख 35 हजार 303 मतदार असल्याची नोंद होती. यावेळी एकूण मतदारांपैकी 1 लाख 54 हजार 789 मतदारांंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 2015 या वर्षांत मृत्यू झालेले, स्थलांतरीत आणि दुबार मतदार असे 15 हजार मतदार कमी करण्यात आले आहेत. सध्या स्थितीत शहापूर तालुक्यात एकूण 2 लाख 48 हजार 708 मतदारांची आधिकृत नोंद आहे. यातील पुरुष मतदार 1 लाख 30 हजार 7 75 मतदार तर महिला मतदार 1 लाख 17 हजार 933 आहेत, असे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -