घरCORONA UPDATECorona Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,२०१ नवे रुग्ण, ३९ जणांचा मृत्यू!

Corona Update: मुंबईत २४ तासांत आढळले १,२०१ नवे रुग्ण, ३९ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २०१ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ३२६वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ९३५ झाला आहे. तसेच २४ तासांत १ हजार २६९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५७ हजार १५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईत चीनपेक्षाही कोरोनाचे अधिक बळी गेले आहेत.

- Advertisement -

आज मुंबई ७६२ संशयीत रुग्ण भर्ती झाले असून आतापर्यंत ५९ हजार १८१ संशयीत रुग्ण भर्ती झाल्याचा आकडा आहे. गेल्या ४८ तासांत ३९ मृत्यू झाले आहे. यापैकी ३२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २३ रुग्ण पुरुष आणि १६ रुग्ण माहिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, २२ जणांचे वय ६० वर्षावर होत, तर उर्वरित १५ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईतील रिकव्हरीचा रेट ६७ टक्के एवढा आहे. ५ जुलै पर्यंत मुंबईत ३ लाख ५९ हजार १५९ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर ४४ दिवस आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यातील कोरोना बळींचा आकडा ९ हजार पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -