मुंबईत आज कोरोनाचे १,२६३ नवे रुग्ण, तर ४४ जणांचा मृत्यू

मुबंईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९२ हजार ७२० वर पोहोचली आहे

Mumbai Corona Update: 961 new patients in Mumbai, more infected than corona free patients today
Mumbai Corona Update: मुंबईत ९६१ नवे रुग्ण, आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या वाढली

मुंबईमध्ये आज १ हजार २६३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९२ हजार ७२० वर पोहोचली आहे. तर ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार २८५ वर पोहोचला आहे.

मृतांमध्ये ३२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २९ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३२ जण हे ६० वर्षांवरील, तर ८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ४४ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत.

मुंबईत कोरोनाचे ९४९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार ६१६ वर पोहचली आहे. तसेच १ हजार ४४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६४ हजार ८७२ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Corona Update: राज्यात ७,८२७ नव्या रूग्णांची नोंद, तर १७३ जणांचा मृत्यू