घरCORONA UPDATECoronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२९८ कोरोनाचे नवे रुग्ण; ६७ जणांचा मृत्यू

Coronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२९८ कोरोनाचे नवे रुग्ण; ६७ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या तीन दिवसांपासून येत असलेल्या मृतांच्या आकड्यांमध्ये मात्र फरक असल्याचे आज दिसून आले. रोज ७० च्या पुढे असणारे कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा आज ६७ आहे. गेल्या २४ तासांत १ हजार २९८ नवे रुग्ण मुंबईत आढळून आले असून ५१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने आजची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत ६२ हजार ७९९ इतकी कोरोनाबाधितांची संख्या मुंबईमध्ये झाल्याचे समजते. तर आतापर्यंत ३१ हजार ८५६ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या २७ हजार ६३४ अॅक्टीव्ह केसेस आहेत. तसेच मुंबईमध्ये आतापर्यंत ३ हजार ३०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात १ लाख २० हजार कोरोना रुग्ण 

तर राज्यात आज तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १०० जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला असून यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्णांनी नोंद असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. तसेच एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ इतका आहे.

हेही वाचा –

‘कोविड’ उपाययोजनांमध्ये सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -